Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सर्व शिक्षक बंधू भगिनींचे माझ्या नवीन ब्लॉग वर हार्दिक हार्दिक स्वागत.

Tuesday, 31 January 2017

MDM Mobile APP

डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लीक करा


MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे.

Notice
नमस्कार !! दिनांक २१/०१/२०१७ पासून ते ३१/0१/२०१७ पर्यंत शाळांकरिता दिनांक ०१ ऑगस्ट १६ ते ३१ जानेवारी १७ पर्यंत शाळांची त्यांनी न भरलेल्या दिवसांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची सुविधा केंद्रप्रमुख तसेच तालुका स्तरावर देणेत आलेली आहे. तसेच या पूर्वी भरलेल्या उपस्थितीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. तसेच दैनंदिन माहिती भरण्यासाठी (MDM Daily Attendance) नवीन MDM App तयार करण्यात आले आहे. ते डाउनलोड करून घ्यावे.

Monday, 30 January 2017

फोटोंच्या साहाय्याने व्हिडीओ कसा बनवायचा हे बघण्यासाठी हा स्वनिर्मित  व्हिडीओ आवर्जून बघा

शैक्षणिक अँप



प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम

अंतर्गत मोबाइल डिजीटल शाळांना वाव मिळाला, पाहता पाहता हजारो शाळा मोबाइल डिजीटल झाल्या…

परंतू मोबाइल हे केवळ व्हिडीओ व चित्र पाहण्यापुरते मर्यादित नसून याद्वारे असंख्य शैक्षणिक अॅप्‍स चा मनमुराद आनंद आम्ही विद्यार्थ्यांना मिळवून देवू शकतो, फक्त गरज आहे ते अॅप्‍स माहीत होण्याची.

केवळ मी काही अॅप्सची यादी देतो म्हटलं तर हजारो अॅप्सची यादी आपल्याला गूगल बाबाच्या सहाय्याने देता येईल, परंतू ते अॅप्‍स किती प्रभावी व परिणाम कारक हे तेव्हाच सांगता येईल जेव्हा मी ते अॅप्‍स वापरलेले असणार…

आणि  म्हणून ही यादी..

*आपले आवडीचे app व वापर लिहा व forward करा.*

1. Kidsmath
गणित प्रक्रिया बालकांकरीता उपयुक्त
2. Barakhadi 2.0
बाराखडी साधे शब्द
3. Animal ABC
4. eschool4scratch
खेळातून मनोरंजन, शब्दसंपत्तीत वाढ
5. Animal 4D
आभासी प्रतिमा दाखवणे
6. Hello English
इंग्रजी सराव करीता उपयुक्त
7. Attendance taker
विद्यार्थी हजेरी
8. Anatomy 4D
मानवी शरीर अंतर्बाह्य रचना
9. Space4D
अंतराळ अभ्यास
10. Marathi kids
धुळपाटी सारखा वापर, वर्णमाला, अंकओळख, गणित, भाषा वापर
11. 50marathistories
50 छान छान गोष्टी आहेत
12. Android Balwaadi
मराठी, इंग्रजी वाचन लेखन
13. Writings ABC 123
इंग्रजी मुळाक्षरे कसे लिहावे
14. Kings of Math
वर्ग ५ चे गणित
15. Jay Maharashtra
थोर व्यक्तींची माहीती
16. Numbers
अप्रगत मुलांसाठी
17. Kinemaster
व्हिडिओ बनवू शकतो
18. How to make origami
कागदापासून वस्तू कशा तयार कराव्यात याचे चलचित्र
19. Google Maps
एखाद्या ठिकाणचा नकाशा पाहणे
20. Kids paint
विद्यार्थ्यांकरीता ड्राईंग
21. Educational Games
एकत्रित मनोरंजन खेळ
22. Google Earth
गूगल मॅपला सबस्टिट्यूट
23. Solar system
सर्व प्लॅनेट विषयी माहिती देता येते
24. Quiz maker
ऑफलाइन टेस्ट बनविणारे apps
25. Tricks for GK
प्रत्येक गोष्ट लक्षात राहण्यासाठी tricks
26. Anmol goshti
बालकांकरीता कथा
27. Marathi dictionary
समानार्थी शब्द
28. English Marathi Dictionary
इंग्रजी मराठी शब्द
29. Khagol vishw
भूगोल teaching साठी उपयुक्त
30. ezpschool
पाठपुस्तक pdf दाखवणे
31. Google translation
कोणत्याही भाषेतून भाषांतर
32. Foxit pdf
पुस्तकांसोबत interactions
33. Starchart
अवकाश अभ्यासासाठी उपयुक्त
34. Gurukul study
इ 1 ली ते 8 वी अभ्यासक्रमातील प्रश्न
35. Gom gr
शासन निर्णय
36. TeamViewer
37. Mirrorop
38. Share it
39. Mobizen
40. Airdroid
हे सर्व apps स्क्रिन कास्ट करीता
41. Google Googles
चित्र वरुन searching करा
42. Skype
व्हिडिओ कॉल अत्युत्तम 2G वर पण
शैक्षणिक
43. Math tips and tricks
गणितातील क्लृप्त्या
44. Vedik Math
45. Xallaps multiplication
46. – – Addition
47. – – greater than less than
48. Math formulae
49. Clock learning
50.eduDroid
51. amazing india in hindi
52. shivaji & Maratha empire
53. ABC handwriting free
54. kid science : biology
55. Fun with Dots – kids learning
56. 35 pictures stories for kids
57. my class shedules
58. sky guide for kids
59. olympaid quiz
60.  Nasa app
61. Chota bheem
62. Indian currancy game
63. math challenge
64. science game for kids
65. kelvin
66. kids gk test
67. science experiment with water
68. Abacus
69. Match and spell
70. Animal planet
71. Brain Trainer special
72.English conversation
73.Lanets space facts
74.Fun easy learn english
75.Evo memo
76.1St std marathi
77. Cursive lite
78. Fun do science
79. colourful vitamins
80. hindi writing
81. Junior science master
82. Creative kids
83.marathi mulalshare
84. Kids craft ideas
85. kidzoo
86. kids experiments
87.sage kids
88. kids encyclopedia
89. forts of maharashtra
90. Tux4kids
गणिताचा सराव
91. Hello English
नविन शब्दांचे उपयोजन सोदाहरण
92. Qr droid
Q R code ला scan करणेकरीता, अभ्यासक्रम पुस्तके या qr कोड सह आलेली आहेत.
93. Picsart
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
94. Blendcollage
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
95. Way 2 SMS
फ्रि SMS जगभर
96. Paytm
डेबिट कार्ड वरुन रिचार्ज
97. Vidmate
98. Tubemate
यू ट्यूब व्हिडीओ डाऊनलोडर
99. Kingsoft office
100. Office suit
Ms office चा वापर
101. Marathi Greetings
शुभेच्छापत्र बनविणे
102. Passportpics
पासपोर्ट बनविणे
103. Lumosity
बुद्धि ला खुराक
104. Flowers color
106. Flash card for kids
107. Gadwat
किल्ले
108. Khara mitr
109. Varnmala lite

Sunday, 29 January 2017

*सर्व कविता लिंक*

*सर्व कविता लिंक*
📕मराठी इयत्‍ता पहिली
http://goo.gl/yH3rcB
📗मराठी इयत्‍ता दुसरी
http://goo.gl/TN9sEp
📕मराठी इयत्‍ता तिसरी
 http://goo.gl/WUG3Zm
 📗मराठी इयत्‍ता चौथी
http://goo.gl/P55xgj
 📕मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
http://goo.gl/PmyAVt
📗मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
http://goo.gl/9wFgJH
📕मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
http://goo.gl/U4Evnu

आणि

 ✈🏂इंग्रजी इयत्‍ता पहीली
http://goo.gl/TxM3m3
🏂इंग्रजी इयत्‍ता दुसरी
http://goo.gl/IVRXTm
🏂इंग्रजी इयत्‍ता तिसरी
http://goo.gl/UTPQNd
🏂इंग्रजी इयत्‍ता चौथी
http://goo.gl/HLXcUk
🏂इंग्रजी इयत्‍ता पाचवी
http://goo.gl/w5hd4F
🏂इंग्रजी इयत्‍ता सहावी
http://goo.gl/4eSA3i
🏂इंग्रजी इयत्‍ता सातवी
http://goo.gl/S1SJbq

*सर्व कविता मोबाईलवर सहज download करूया*

*आवडले तर नक्‍की शेअर करूया.*

शाळा सिद्धी

🌞प्रिय शिक्षक बंधू भगिनी 🙏

✨ *शाळा सिद्धी : नवीन स्वरूपात* ✨

🔵 *जुने रजिस्ट्रेशन नवीन साईटवर अपडेट करणे* 🔵

🔹 *इंटरनेट सुरु करा.*
🔹 *Google Chrome ओपन करा.*
🔹 *Address bar मध्ये 'www.shaalasiddhi.nuepa.org'  टाईप करा.*
🔹 *'Login' या पर्यायावर क्लिक करा.*
शाळा सिद्धी ची नवीन विंडो समोर येईल.
🔹 *उजव्या बाजूला असलेल्या Login बॉक्स मध्ये User Name च्या रकान्यात आपल्या शाळेचा युडायस क्रमांक टाका.*
🔹 *त्याखाली असलेल्या रकान्यात जुना पासवर्ड टाका.*
🔹 *Submit करा.*
🔹 *New Password ची विंडो समोर येईल.*
🔹 *त्यात नवीन पासवर्ड टाईप करा.* 🌟 *नवीन पासवर्ड टाईप करतांना तो 8 ते 10 अंकीच असला पाहिजे त्यात एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर व स्पेशल कॅरॅक्टर यांचा अंतर्भाव असावा.*
🔹 *त्याखाली रकान्यात हाच पासवर्ड पुन्हा टाका.*
🔹 *सबमीट करा.*
😊 *आपल्या शाळेचा नवीन डॅशबोर्ड समोर येईल.*

✨ *आपली शाळा 'शाळा सिद्धीच्या' नवीन साईटवर समाविष्ट झाली आहे. अभिनंदन* 💐

Monday, 16 January 2017

विविध अॅप ओळख

अॅप ओळख

या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

 WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

 ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त

 Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह

SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !

PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह

Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट

Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह ..

Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

,Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप

Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !

 SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
.
Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर!

VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा

MX Player : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये !

ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय !

Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक करा

Sunday, 15 January 2017

चला लोगो बनवूया


   
       *चला लोगो बनवूया*

1⃣ प्रथम play store मधून pics Art app घ्या .App open करा
खाली + टच करा
खाली draw सिलेक्ट करा

2⃣ Blank निवडा
Template मधून size निवडा
उदा.-2048 × 2048
सिलेक्ट केलेले width व Height येथे दिसते
मग orientation निवडा उभे की आडवे
मग ok करा

3⃣ आता blank page दिसेल
खाली 6 नं ला दिलेल्या आकृतीला सिलेक्ट करा
आता समोरील आकृती मधील गोल निवडा व size कमी जास्त करून घ्या
आता stroke सिलेक्ट करा व ok करा

4⃣ आता परत आपले blank page दिसेल
आता गोल draw करा size हवी तेवढी ठेवा

5⃣ परत अजून एक गोल त्याच  गोलात  काढा
आता परत खाली 6 नं चे  निवडा
गोल निवडा व खाली fill निवडा ok करा

6⃣ आता खालील 1 नं वरील रंगीत चौकोन निवडा यातील हवा तो रंग सिलेक्ट करा व ✅ या वर टिक करा

7⃣आता परत आपण गोल काढला ते पान दिसेल त्याच्या आत  परत गोल काढा
तुम्ही जो रंग निवडला त्याच रंगाचा गोल येथे दिसेल
आता वरती Done करा
मग तुम्हाला खाली 2 option येतील त्यातील Edit Image सिलेक्ट करा

8⃣आता आपला तयार गोल व खाली नवीन option दिसतील(tools)
  खालील 4 नं मधील add फोटो टच करा
आता फोटो निवडा व वरती Add ला टच करा

9⃣ आता तुम्हाला तुम्ही निवडलेला फोटो दिसेल
आता खालील 5 नं चे Shape select करा
आता खाली विविध आकार दिसतील
यातील गोल निवडा व फोटो जवळील बाणाने गोलाची size हवी तेवढी करून घ्या

1⃣0⃣ खाली size हा option आहे व शेजारी colour बॉक्स आहे त्याप्रमाणे size व रंग निवडा
मग वरती उजवीकडे कोपऱ्यात➡आहे तो टच करा आता गोलात फोटो दिसेल
आता उजवीकडे कोपऱ्यातील  ✅ टच करा

1⃣1⃣ आपण तयार केलेल्या पहिल्या रंगीत गोलात निवडलेला फोटो गोलात दिसतो
आता हा फोटो size कमी जास्त करून बरोबर गोलाच्या मध्यभागी ठेवा
(जर हा फोटो नको असेल तर फोटोवर डावीकडे वरती ❌ हे चिन्ह गोलात दिसते ते टच केले की फोटो कट होतो)
आता फोटो गोलात मध्यभागी adjust केल्यावर वरती उजवीकडे ✅टच करा

1⃣2⃣आता बघा - पहिल्या रंगीत गोलात आपण सिलेक्ट केलेला फोटो मध्यभागी दिसतो
आता खालील 9 नं चे (T) Text निवड व type करा व वरील उजवीकडील ✅ टच करा
तुम्ही type केले फोटोच्या वर किंवा खाली घ्यायचे ते ठरवा

1⃣4⃣मग खालील फॉन्ट निवडा व colour निवडा
आता खालील शेवटी असलेले Bend निवडा
Bend डावीकडे वा उजवीकडे adjest करा
आता परत वरती + मधील text घ्या व परत हीच कृती करा
आता यातील sticker निवडा व रंगीत गोलावर adjest करा (त्याची size लहान मोठी करता येते व रंग ही बदलता येतो)

1⃣5⃣ आता आपला लोगो तयार
 वरील उजवीकडील ✅ ok करा
आता काही बदल करायचा ते पहा व त्याप्रमाणे बदल करा
नसेल तर वरील उजवी कडील ✅ ok करा
आता तयार लोगो व त्याखाली पर्याय दिसतील
त्यातील gallery निवडा
तुमचा तयार लोगो gallery मध्ये save Kara?
zpschoolpiliv

Saturday, 14 January 2017

फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो बनवा !

फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो बनवा ! 


पासपोर्ट फोटोचे आपल्याला नेहमी कुठेना कुठे काम पडत असते. फोटो स्टुडिओ मधून फोटो काढणे महाग पडते (?).  तुम्ही म्हणाल की 30रुपयामध्ये  मध्ये ८ किंवा १२ फोटो महाग कसे ?
बघा जर तुम्हाला फोटोशॉप मध्ये पासपोर्ट  फोटो  बनवता येत असेल तर तुम्ही कुठल्याही लॅब मधून त्याची फक्त 5 रुपया मध्ये प्रिंट काढू शकता. माझ्या हिशोबाने तर स्टुडियो मध्ये हे महाग पडते.आता सर्वांकडे उच्चप्रतीचे कॅमेरे असलेले स्मार्टफोन आहेत . तेव्हा फोटो काढा व आपल्या p.c. वर लागा कामाला.
 काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूयात.
चला तर मग फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो बनवणे शिकूया.

टीप : पोस्ट वाचत असते वेळेसच फोटोशॉप चा विंडो ओपेन करून ठेवा व स्टेप बाय स्टेप करून बघा.

1.) सर्वप्रथम फोटोशॉप सुरु.करा टूलबार मधून ओपेन सेलेक्ट करून ज्या फोटोची आपल्याला पासपोर्ट बनवायचा आहे ती ओपन करा.

2.फोटो ओपन झाल्या नंतर क्रॉप टूल निवडा (Ctrl+c). क्रॉप टूल चा उपयोग हा फोटोला हव्यात्या आकारात कापण्यासाठी केला जातो.क्रॉप टूल निवडल्यानंतर  Width मध्ये 1.4 Height मध्ये 1.7 Resolution  मध्ये 300  इनपुट करून इंटर दाबा.

3. आता क्रॉप टूल सेलेक्ट केल्यावर  आपली फोटो त्याच साईज मध्ये कट होते जे आपण बॉक्स मध्ये  इनपुट केले आहे.

4.फोटो ची साईज बनवल्यानंतर टूलबार मधून File वर क्लिक करून New वर क्लिक करा.

5. आता आपल्या समोर नवीन विंडो ओपन झाली असेल ज्यामध्ये

Width 6 inches

Height 4 inches

Resolution 300 inches

Color Mode RGB Color

सेलेक्ट करून ओके करा. आता आपल्या समोर जी नवीन फाईल ओपन झाली ती असेल 4x6 inches.

6. आता मूव्ह टूल ↖सेलेक्ट करून वर Auto-select करा लक्ष्यात ठेवा Auto-select वर क्लिक केल्या शिवाय तुमचे मूव्ह टूल काम करणार नाही.

7. आता तुमच्या या फोटोला माउस ने ओढून आपल्या नवीन फाईल मध्ये नेवून सोडा.

8. नवीन फाईल मध्ये फोटो आल्याच्या नंतर फोटोवर क्लीक करा आणि कीबोर्ड वरून Alt दाबून या फोटोची कॉपी बनवून घ्या. ही नवीन लेयर बनल्या नंतर तुम्हाला लेयर बॉक्स मध्ये वरील प्रमाणे Layer 1 आणि Layer 1 Copy अश्या दोन लेयर दिसतील.

9.आता Layer 1 Copy  वर क्लिक करून कीबोर्ड ने  Ctrl+E दाबा. असे केल्याने तुमची दोन्ही लेयर एकत्र येतील.

10.आता फोटो वर क्लिक करून Alt दाबून फोटोची तीन कॉपीज किंवा लेयर बनवून घ्या.



11. आता Layer 1 Copy 3 वर क्लिक करून कीबोर्ड ने Ctrl+E तीन वेळेस दाबा जेणेकरून सर्व लेयर्स एकत्र येतील. बस झाले आता तुमची पासपोर्ट तयार आहे.


12. आता तुमची फोटो तयार झाली. आता हि फोटो फक्त JPEG फॉर्माट मधेच सेव्ह करा. . अडचण आल्यास विचारा. मित्रांनो सुरुवातीला फोटोशॉप कठीण वाटेल .नंतर मात्र  Editing करण्यात मजा येते .करा प्रयत्न.

Thursday, 12 January 2017

मकर संक्रांतीचे महत्व

श्री मकर संक्रांतीचे महत्व

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय   महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी  दिनांक
१३ ला भोगी, १४ ला मकर संक्रांति,
१५ ला  किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे

संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-

फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो.

या तीन दिवसी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.

भोगी:-

दि. १३/०१/२०१७  रोजी शुक्रवार

पौष कृष्णपक्ष प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी अजुन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

मकर संक्रांत:-

दि.१४/०१/२०१७  रोजी शनिवारी पौष कृष्ण द्वितीया या दिवशी पुण्यकाल हा सकाळी ०७:३७ ते दुपारी ०३:३८ मी पर्यंत आहे.

मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. ह्या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून, दागिने, नाकात नथ घालून तयार होवून बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात.

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.

संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.

किंक्रांत:-

दि १५/०२/२०१७  रोजी रविवार

पौष कृष्ण तृतीया हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत ह्या दिवशी अजुन किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.

यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे

इ स १९७२ सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासकाची यांची आहे.

 त्यामुळे मकर संक्राती पुण्यकाळ यावेळी १४ जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी मकर संक्रांती १५ जानेवारीलाच येते  हे खरे नाही. सुर्‍याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या  वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो, अशी माहिती सोमण यांनी दिली.

सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७१ पासून सन निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती.  १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे सरकत सरकत ३२४७ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले आहे.

मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थ वापरत असतो. दिनमान वाढत जाणे,  त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. मकर संक्रांतीच्या  वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे

हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.

संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-

या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।

तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।

( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनूसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनूसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल.

मेष -
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे.

वृषभ -
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे.

मिथुन -
या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कापड, तीळ, मच्छरदानीचे दान करावे.

कर्क -
या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शाबूदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करावे.

सिंह -
या राशीच स्वामी सूर्य आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माणिक, गहू, लाल कापड, लाल फूल , गुळ , सोने, तांबे, चंदन दान करावे.

कन्या -
या राशीचा स्वामी बुध आहे, राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद, तिळाचे दान करावे.

तूळ -
या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत.

वृश्चिक -
या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना तांदूळ , खिचडी, धान्य दान करावे.

धनु -
या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभ-याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल.

मकर -
या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांना तिळ, तेल, काळी गाय, काळे वस्त्र यांचे दान करावे.

कुंभ -
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे. त्यामुळे या राशीच्या तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे.

मीन -
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यांचे दान करावे.

*🌹🌹jk8🌹🌹*

Wednesday, 11 January 2017

जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"





"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"


© हि माहाती Pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी click here
असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.
आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !
या मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले ! इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी !
आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी !
याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती ! हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !
आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.
अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.
आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी
आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?
जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ? या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?
ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ - सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?
आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची ! हिंदूंची असो व मुस्लिमांची ! तीच गुलामगिरी तोच अन्याय ! अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता ! आज हि गर्भातच तिची हत्या !
मग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात ! बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का ?
आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !
इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….
स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा ! आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा ! येणाऱ्या पिढीला जिजाऊ - सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा !
इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी - संस्कारांनी उजाळून जाईल !
याची सुरुवात आपल्या घरापासून करा ! तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा ! फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव - निर्माण घडू दे !!
पुन्हा एकदा राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !
जय जिजाऊ - जय शिवराय
सौजन्य :
आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम
www.jijau.com



〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓


राजमाता जिजाबाई

 जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.          

  सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.  पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.           

पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.           

 शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.         

     शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.          

 राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.    

    आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ भोसले !!! - 


Tuesday, 10 January 2017

सेल्फी शंका निरसन

सेल्फी शंका निरसन 

१)  *जर आपल्या शाळेतील शिक्षक रजेवर असेल तर त्या दिवसांची त्या वर्गाची हजेरी कोणी भरावी ?*

*उत्तर* : जर आपल्या शाळेचा एखादा शिक्षक रजेवर अथवा ट्रेनिंग साठी शाळेबाहेर असेल तर त्या वर्गाची हजेरी ही  student पोर्टलला Online  भरावी.तशी सुविधा लवकरच देण्यात    येणार आहे. सध्या ही सुविधा दिलेली नाही.

२) *एक शिक्षकी किंवा द्विशिक्षकी शाळेतील शिक्षक रजेवर असल्यास ती  शाळा चालविण्यासाठी दुसऱ्या शाळेतील शिक्षक  काही दिवस त्या  शाळेत  गेले, तर त्यांच्या स्वतःच्या वर्गाची हजेरी कोणी भरावी ?*

*उत्तर* : अशा केस मध्ये त्यांच्या मूळ शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या वर्गाची  हजेरी student पोर्टल ला लॉगिन करून भरू शकतील.तशी सुविधा  लवकरच देण्यात येणार आहे.

३) *ज्या शाळेतील शिक्षक रजेवर आहे अशा केस मध्ये त्या वर्गाची  उपस्थिती मुख्यध्यापकांनी भरावी परंतु जर याच उदाहरणामध्ये    मुख्याध्यापक देखील रजेवर असतील तर त्या  वर्गांची हजेरी कोणी  भरावी?*

*उत्तर* : शाळेतील ज्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा चार्ज असेल अशा  शिक्षकांनी अथवा शाळेत उपलब्ध असेल अशा इतर कोणत्याही  शिक्षकांने रजेवर असतील अशा शिक्षकांच्या वर्गाची हजेरी  student पोर्टल ला जाऊन online पद्धतीने भरावी.  

४) *उपस्थिती  App द्वारे  कोणत्या वर्गापर्यंत पर्यंत उपस्थितीची नोंद घ्यायची आहे ?*
 
*उत्तर* : उपस्थिती  App हे  सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी इयत्ता १    ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व वर्गासाठी वापरावयाचे आहे.

५) *एखाद्या दिवशी काही कारणास्तव उपस्थिती नोंद घेता आली नाही  तर दुसऱ्या दिवशी भरता येईल काय?*

*उत्तर* : कोणत्याही कारणास्तव अँप मध्ये उपस्थिती नोंद करावयाची  राहून गेल्यास ती उपस्थिती दुसऱ्या दिवशी नोंदवता येईल. ही  सुविधा फक्त सुरुवातीला काही दिवसच  देण्यात येणार आहे.परंतु  सेल्फीसह उपस्थिती नोंदवताना मात्र ही सुविधा देण्यात आलेली  नाही आहे हे लक्षात घ्यावे.सेल्फीसह उपस्थितीची नोंद घेताना  विद्यार्थ्यांचे सेल्फी काढून ते त्याच दिवशी save करावे,इतर दिवशी  save करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. save केलेले सेल्फी  हे त्याच दिवशी किंवा वर्गशिक्षक जेंव्हा Network जातील तेंव्हा  कोणत्याही दिवशी submit करता येईल,याची काळजी system  कडून घेण्यात आलेली आहे.

६) *ज्या शिक्षकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्या वर्गाची हजेरी कोणी  भरावी ?*

*उत्तर* :  जर मुख्याध्यापकाकडे अथवा अन्य कोणत्याही शिक्षकाकडे  अँड्रॉइड मोबाईल असेल तर अशा वर्गाची उपस्थिती ही त्यांनी नोंद  करावी.अशा प्रकारे उपस्थिती नोंद करण्यासाठी अशा अँड्रॉइड  मोबाईल असलेल्या शिक्षकाचा student पोर्टल ला रजिस्टर  असलेला mobile क्रमांक  अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या वर्ग  शिक्षकाच्या नावासमोर student पोर्टल च्या शाळेच्या लॉगीन मध्ये  जाऊन  टाकावा लागेल.त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल असलेल्या  शिक्षकाच्या उपस्थिती app मध्ये अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या वर्ग  शिक्षकांचे वर्ग देखील दिसून येईल. परंतु कोणत्याही शिक्षकाकडे   कडे अँड्रॉइड मोबाईल नसेल तर त्यांच्या वर्गाची हजेरी  मुख्याध्यापकाने online पद्धतीने student पोर्टल ला  जाऊन भरावी. तशी सुविधा लवकरच देण्यात येणार आहे.

७)  *एखाद्या  शाळेतील महिला शिक्षिका प्रसुती रजेवर अथवा इतर  कोणताही शिक्षक दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्याने तेथे एका  शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती केली आहे .अशा दीर्घ मुदतीच्या  रजेवर गेलेल्या वर्ग शिक्षकांच्या वर्गाची माहिती कोणी भरावी?*

*उत्तर* : अशा उदाहरणामध्ये तात्पुरती नियुक्ती केलेल्या शिक्षकांनी अँप  द्वारे उपस्थिती नोंद करावी. त्यासाठी ज्या शाळेत या शिक्षकांची  तात्पुरती नियुक्ती केलेली आहे अशा शाळेच्या student पोर्टल ला  या शिक्षकाने आपले नाव तात्पुरते नोंदवावे आणि त्या वर्गाला  assign करून घेऊन अँप रजिस्टर करावे.जर असा शिक्षक त्याच्या  मुळ शाळेत वर्गशिक्षक म्हणून एखाद्या वर्गाला रजिस्टर असेल तर  त्यांनी त्या वर्गाची हजेरी भरू नये,त्यांच्या मुळ शाळेच्या वर्गाची  हजेरी भरण्याची जबाबदारी त्यांच्या मुळ शाळेच्या  मुख्याध्यापकांची राहील. ज्या वेळी तात्पुरती नियुक्ती झालेला  शिक्षक आपल्या मुळ शाळेत जाईल त्या वेळी अशा शिक्षकास या  शाळेतून delete करावे.

८)  *मोबाईल हँग होणे, डिस्चार्ज होणे, नेटवर्क प्रॉब्लेम अथवा तांत्रिक  अडचणीमुळे त्या दिवशी सेल्फी घेता आली नाही तर संबंधीत  वर्गशिक्षकाने  काय करावे ?*

*उत्तर* : अशा उदाहरणामध्ये  मुख्याध्यापकाने  अथवा सेल्फी घेण्याची  सुविधा असलेल्या आपल्याच शाळेतील एखाद्या शिक्षकाने  संबंधीत  वर्गशिक्षकाचा वर्ग स्वतःला assign करावा आणी आपल्या mobile  मधून सेल्फीसह उपस्थितीची नोंद करावी.

९) *सेल्फी घेण्याची वेळ कोणती आहे ?*

*उत्तर* : सेल्फी घेण्यासाठी अशी कोणतीही वेळ निश्चित करण्यात आलेली  नाही. मात्र सेल्फी ही शाळेच्या वेळेतच घेऊन save करावी  याबाबत बंधन घालण्यात आलेले आहे.आपल्या वर्गातील जास्तीत  जास्त  मुले जेंव्हा शाळेत येतील आणि वर्ग शिक्षकास जेंव्हा वाटेल  की यानंतर मुले आता येऊ शकणार नाही त्यावेळी सेल्फी घ्यावा व  save करून ठेवावा.त्यानंतरही काही मुले शाळेत आलेच तर ते  जेंव्हा येतील त्या वेळेला त्यांचा सेल्फी काढावा आणी जेंव्हा वाटेल  की आता यानंतर मुले येऊ शकणार नाही त्या वेळेला save केलेले  सेल्फी submit करावेत.

१०) *सेल्फी/उपस्थिती submit केल्यानंतर एखादा विद्यार्थी दुपार नंतर  उपस्थित राहिल्यास त्यांच्या उपस्थितीचे काय करावे?*

*उत्तर* : एकदा सेल्फी/उपस्थिती submit केली की त्यानंतर अशा  विद्यार्थ्यांची उपस्थिती submit करण्याची कोणतीही सुविधा  देण्यात आलेली नाही आहे.या साठी जेंव्हा आपणास खात्री होईल की  आता या वेळेनंतर कोणताही विद्यार्थी शाळेत येणार नाही त्याच  वेळी आपण आपली उपस्थिती submit करावी.

११) *एखादा  विद्यार्थी  दुसऱ्या शाळेत दाखल झाला परंतु  ऑनलाईन  पहिल्या शाळेत दिसतोय अशा वेळी दोन्ही शाळेनी कोणती भूमिका  घ्यावी ?*

*उत्तर* : विद्यार्थी ज्या शाळेत सध्या दाखल आहे अशा शाळेने जुन्या  शाळेकडे विद्यार्थी ट्रान्स्फर Request पाठवून त्या विद्यार्थ्यास  ट्रान्स्फर करून घ्यावे आणि त्याची उपस्थिती घेण्यास सुरुवात  करावी.

१२) *काही शाळांनी एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्याकडे  शिकायला आला असता त्या शाळेला ट्रान्स्फर Request न पाठवता  New एन्ट्री द्वारे अशा विद्यार्थ्याची नोंद करून घेतली आहे.अशा  केस मध्ये सदर विद्यार्थी दोन्ही शाळेत दिसून येत आहे.जुन्या शाळेने  अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत उपस्थिती बाबत काय करावे ?*

*उत्तर* : अशा केस मध्ये जुन्या शाळेने अशा विद्यार्थ्यांच्या नोंदी या  Not    Known तुकडीत ट्रान्स्फर कराव्यात .

१३) *एखाद्या शिक्षकाकडे जर फ्रंट कॅमेरा असलेला mobile नसेल परंतु  back कॅमेरा असलेला mobile असेल तर अशा mobile मधून  सेल्फीसह उपस्थिती कशी घ्यावी ?*

*उत्तर* : या केस मध्ये वर्ग शिक्षक फ्रंट कॅमेरा द्वारे सेल्फी सह उपस्थिती घेऊ  शकत नाही.परंतु आपल्या सेल्फी सह उपस्थिती घेण्याच्या प्रक्रियेत  असे नाही आहे की फ्रंट कॅमेराच वापरावा,उपस्थिती नोंदवत  असताना विद्यार्थ्या सह वर्ग शिक्षक त्या फोटो मध्ये असावा असे  अपेक्षित आहे. त्यामुळे back कॅमेराचा उपयोग करून जरी आपण  फोटो काढला तरी सुद्धा चालणार आहे.सेल्फी हा त्या वर्ग  शिक्षकांनीच काढावा असे नसून इतर कोणीही काढला तरी चालेल  मात्र त्या फोटोत विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक असावा असे अपेक्षित  आहे.

१४) *उपस्थिती App हे विंडोज आणि Apple किंवा इतर कोणत्याही  mobile operating system  ला चालू शकेल का ?*
 
*उत्तर* : नाही.उपस्थिती app हे फक्त Android operating system    असलेल्या mobile मध्येच चालणार आहे.

१५) *उपस्थिती app इंस्टाल करताना There was a problem while  parsing the package अशी समस्या येत असेल तर काय करावे?*
 
*उत्तर* : mobile द्वारे student पोर्टल ला लॉगीन करून आपण उपस्थिती  app download करतो.ही क्रिया करताना सर्वानी एक बाब लक्षात  घ्यावे एकी आपल्या mobile कंपनीने इंटरनेट ब्राउज करण्यासाठी  जे ब्राऊजर दिलेले आहे त्याचाच वापर करावा.तरीही आपणास  समस्या येतच असेल तर अशा वेळी पुढील लिंक चा वापर करून  आपण उपस्थिती app हे download करावे.



१६) *एकाच वर्ग शिक्षकाकडे अनेक वर वर्ग असेल म्हणजेच एकच शिक्षक  अनेक वर्गाचा वर्ग शिक्षक असेल तर अशा वेळी उपस्थिती app मध्ये  उपस्थिती कशी नोंद करावी?*

*उत्तर* : एकाच वर्ग शिक्षकाकडे अनेक वर वर्ग असेल म्हणजेच एकच  शिक्षक अनेक वर्गाचा वर्ग शिक्षक असेल (एक/दोन शिक्षक असलेली  शाळा) तर सर्व वर्गाची उपस्थिती ही उपस्थिती app द्वारे भरणे  सहज शक्य आहे.यासाठी जेवढे वर्ग आहे तेवढ्या प्रमाणात app  इंस्टाल करणे गरजेचे नाही आहे.यासाठी student पोर्टल ला जेंव्हा  आपण वर्गशिक्षकाला तो ज्या वर्गाला वर शिक्षक म्हणून काम करतो  त्या वर्गाला  assign करतो,त्या वेळी तो ज्या वर्गाला वर्ग शिक्षक  म्हणून  आहे तेवढे वर्ग assign करणे गरजेचे आहे.म्हणजे जेंव्हा  आपण app मध्ये उपस्थिती भरू त्या वेळी तेवढे वर्ग/तुकडी  आपणास दिसून येईल.अशा वर्गाची उपस्थिती नोंद घेताना  उपस्थिती app मध्ये एक  वर्गाची उपस्थिती submit करावी आणि  त्या नंतर दुसऱ्या वर्गाची उपस्थिती submit करावी.

१७) *ज्या दिवशी सेल्फी सह उपस्थिती नोंद करावयाची आहे त्याच   दिवशी उपस्थिती देखील घ्यावयाची आहे काय ?*

*उत्तर* : हो.ज्या दिवशी सेल्फी सह उपस्थिती घ्यावयाची आहे त्या दिवशी  उपस्थिती घेऊन submit करावयाची आहे.


१८) *सेल्फी सह उपस्थिती कोणत्या दिवशी घ्यायची आहे ?*

*उत्तर* :  महाराष्ट्र शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१६ च्या शासन  निर्णयानुसार जानेवारी महिन्याच्या दर  सोमवारी शाळेच्या पटावर  असलेल्या सर्व मुलांची १० च्या गटात वर्ग शिक्षकासोबत सेल्फी  घेण्यात यावी असे अपेक्षित आहे. सुरुवातीला दोन सोमवार नंतर  फक्त अनियमित राहणाऱ्या मुलांचे सेल्फी घेण्यात यावे असे निर्देश  देण्यात आलेले आहेत.

१९)  *सुरुवातीला दोन सोमवार नंतर फक्त अनियमित राहणाऱ्या मुलांचे  सेल्फी घेण्यात यावे असे शासन निर्णयात निर्देश दिलेले आहेत.मग  अनियमित मुले कोणाला समजावे ?*

*उत्तर* : एका आठवड्यात ३ किंवा ३ पेक्षा अधिक दिवस गैरहजर  असणाऱ्या विद्यार्थ्यास अनियमित विद्यार्थी समजण्यात येणार  आहे.अशा विद्यार्थ्यांची यादी दोन आठवड्यानंतर आपल्या लॉगीन  ला दाखवण्यात येणार आहे.दोन आठवड्यानंतर अशाच मुलांची  सेल्फी सह उपस्थिती नोंद घ्यायची आहे. त्यानंतर याच मुलांवर लक्ष  केंद्रित करून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व  स्तरावरून कार्य करावयाचे आहे.मात्र उपस्थिती द्वारे हजेरी नोंद  घेताना सर्व मुलांची उपस्थिती रोजच्या रोज घेतली जाणार आहे. 

२०)  *जर सोमवारी सेल्फीसह उपस्थिती घ्यायची आहे आणि याच     दिवशी वर्ग शिक्षक रजेवर असेल तर मग अशा वेळी काय करावे ?*

*उत्तर* :  जर सोमवारी सेल्फीसह उपस्थिती घ्यायची आहे आणि याच  दिवशी वर्ग शिक्षक रजेवर असेल तर अशा उदाहरणामध्ये  प्रथमतः  मुख्याध्यापक व मुख्याध्यापक नसेल तर  शाळेतील अन्य  कोणताही  शिक्षक की ज्याला त्या वर्गाची जाबाबदारी दिलेली आहे  ते  त्या  वर्गाला स्वतः ला assign करून घेईल व त्या वर्गाची  सेल्फी सह  उपस्थितीची नोंद करेल.कोणत्याही परिस्थितीत  सोमवारी सेल्फी  सह उपस्थितीची नोंद केली जावी अशी अपेक्षा  आहे.

२१) *उपस्थिती मध्ये फक्त गैरहजर मुलांची नोंद घ्यायची आहे आणि  सेल्फी सह उपस्थिती मध्ये मात्र सेल्फी मध्ये असलेल्या हजर मुलांची  उपस्थिती घ्यायची आहे.तर अशा वेळी जर उपस्थिती मध्ये गैरहजर  म्हणून नोंद केलेले विद्यार्थी सेल्फी मध्ये हजर म्हणून दाखवले  जातात.अशा वेळी चुकून जर उपस्थिती मध्ये एखादा मुलगा  गैरहजर म्हणून दाखवला गेला आणि सेल्फी मध्ये तोच मुलगा हजर  म्हणून दाखवला गेला किंवा याउलट झाले तर काय करावे ?*

*उत्तर* : अशा उदाहरणामध्ये उपस्थिती मध्ये गैरहजर विद्यार्थी select  करताना काळजीपूर्वक select करावेत.जेणेकरून  अशा  चुका होणार  नाही याची काळजी घ्यावी.अशा केस मध्ये  इतर  कोणताही उपाय  नाही आहे हे लक्षात घ्यावे.कोणत्याही  सुविधेमधून विद्यार्थी  उपस्थिती एकदा submit झाली की त्यात  कोणताही बदल करता येत नाही.

२२) *उपस्थिती app मध्ये हजेरी भरताना ती शाळेत जाऊनच भरावी  असे अपेक्षित आहे काय ?*

*उत्तर* : विद्यार्थ्यांची उपस्थिती हे शाळेतून जाऊनच भरावी असे अपेक्षित  आहे.परंतु ज्या शाळेत कोणत्याही प्रकारचे network नाही अशा  शाळांना मात्र यात खालीलप्रमाणे सवलत देण्यात आलेली आहे. 
उपस्थिती app द्वारे उपस्थिती नोंद करताना जर शाळेत network  नसेल तर अशा केस मध्ये त्या शाळेच्या वर्गशिक्षकांनी network  मध्ये गेल्यावर उपस्थिती भरावी.जर वर्ग शिक्षक त्याच दिवशी  network मध्ये जाणे शक्य नसेल तर अशा केस मध्ये तो वर्गशिक्षक  जेंव्हा network मध्ये जाईल त्या दिवशी त्यांनी मागील सर्व  दिवसांची उपस्थिती submit करावी.परंतु अशा network  नसलेल्या शाळा कोणत्या आहेत आणि अशा कोणत्या शाळांना ही  सुविधा उपलब्ध करून द्यायची अथवा नाही याविषयीची सुविधा  वरिष्ठ कार्यालयाला देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.वरिष्ठ  कार्यालयाने Map केलेल्या अशाच शाळांना ही  सुविधा  देण्यात  येणार आहे.
    सेल्फी सह उपस्थितीची नोंद करताना मात्र वेगळ्या प्रकारची  सुविधा देण्यात आलेली आहे.या मध्ये वर्गशिक्षकाने network मध्ये  नसले तरी सेल्फी काढून त्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती  रोजच्या रोज save करावी.network नसल्याने ही save केलेली  उपस्थिती त्यांना submit करता येणार नाही.ज्या दिवशी  वर्गशिक्षक network मध्ये जाईल त्या दिवशी त्यांनी ही save  केलेली सेल्फीसह उपस्थिती submit करावी.हे करत असताना एक  बाब लक्षात घ्यावी की ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांचे सेल्फी काढतो  व save करतो त्याच वेळेला त्या सेल्फी सोबत आपण काढत  असलेल्या सेल्फी सोबत आपल्या ठिकाणाचे अक्षांश-रेखांश म्हणजेच  Lat-Long हे save केले जाते.म्हणजेच यावरून विद्यार्थ्याचे  काढलेले सेल्फी हे शाळेमधूनच काढलेले आहे अथवा नाही हे समजून  येते.आपल्या शाळेचे अक्षांश-रेखांश म्हणजेच Lat-Long हे  system मध्ये आगोदरच save करण्यात आलेले आहे. या  Lat- Long चा आणि सेल्फी काढलेल्या Lat-Long ची तुलना करून  सदर उपस्थिती ही शाळेमध्येच save केलेली आहे अथवा नाही  याचा रिपोर्ट हा वरिष्ठ कार्यालयाला online उपलब्ध करून देण्यात  आलेला आहे.त्यामुळे सेल्फी सह उपस्थिती नोंद करताना network  नसणाऱ्या शाळांनी सेल्फी हा शालेतच काढावा परंतु submit  करताना कोठूनही केला तरी चालणार आहे.सेल्फी सह उपस्थिती ही  फक्त सोमावारी घ्यायची आहे परंतु सोमवार वगळता इतर दिवशी  उपस्थितीची  नोंद करताना देखील system कडून  Lat-Long ची  नोंद घेतली जाणार आहे व अशा केस मध्ये network नसलेल्या  किंवा शाळेतून उपस्थितीची नोंद न केलेल्या वर्ग शिक्षकांची व  शाळांच्या माहितीचा रिपोर्ट हा गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी  व इतर वरिष्ठ लॉगीन ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२३) *उपस्थिती app द्वारे विद्यार्थी  उपस्थिती एकदा submit केली की  त्यानंतर त्यात काही बदल करता येईल का ?*

*उत्तर* : नाही.एकदा submit केलेली उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत  पुन्हा बदलण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.त्यामुळे submit  करताना या बाबत काळजी घ्यावी.

२४) *उपस्थिती app द्वारे उपस्थित विद्यार्थी नोंद केल्यावर ही उपस्थिती  शालेय पोषण आहार app मध्ये घेतली जाणार आहे,हे खरे आहे  काय ?*

*उत्तर* : हो.पुढील काही दिवसानंतर ही उपस्थिती शालेय पोषण आहार     माहिती साठी घेतली जाणार आहे.त्या बाबतची कार्यवाही सुरु    आहे.योग्य वेळी याविषयीची सुचना सर्वांना देण्यात येईल.

२५) *आपल्या शाळेत काही शिक्षक हे अनुदानित तुकडीवर काम करत  आहेत तसेच काही शिक्षक हे मात्र विनानुदानित तुकडीवर देखील  आहेत.विनानुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षकांची वैयक्तिक  मान्यता नसल्याने त्यांना student पोर्टल मध्ये उपस्थिती app  साठी रजिस्टर केले तर चालेल का ?*
 
*उत्तर* : उपस्थिती app द्वारे उपस्थिती नोंदवण्यासाठी त्या वर्गाच्या वर्ग  शिक्षकाची आवश्यकता आहे.वर्ग शिक्षकाला वैयक्तिक मान्यता असणे  किंवा नसणे ही बाब त्यासाठी महत्वाची नाही आहे.भविष्यात तो  शिक्षक शाळेत असेल नसेल अथवा त्यांना वैयक्तिक मान्यता मिळेल  अथवा न मिळेल याचा आणि उपस्थिती app ला रजिस्टर  करण्याचा काहीही संबंध नाही.कोणत्याही वर्ग शिक्षकाला आपण  उपस्थिती app साठी रजिस्टर करू शकता.

२६) *उपस्थिती app हे फक्त student पोर्टल लॉगीन करून घेतले तरच  चालेल अथवा चालणार नाही हे कितपत सत्य आहे?*

*उत्तर* : उपस्थिती app हे सर्व शाळांच्या student पोर्टल ला उपलब्ध  करून दिलेले आहे.तेथून आपण download करू शकता.तसेच  आपण आपल्या इतर शिक्षकांच्या mobile मधून सुद्धा शेअर करून  घेऊ शकता.तसेच राज्यस्तरीय whatsapp समूह school.com या  ग्रुप मधून दिलेल्या लिंक द्वारे देखील घेऊ शकाल.

२७) *सोमवारी सेल्फी आणि उपस्थिती या दोन्ही प्रकारे उपस्थिती नोंद  करावयाची आहे.परंतु या दोन्ही प्रकारात आधी उपस्थिती घ्यावी  की सेल्फी?*

*उत्तर* : सोमवारी सेल्फी आणि उपस्थिती या दोन्ही प्रकारे उपस्थिती नोंद  करावयाची आहे. यात कोणता प्रकार आधी करावा याचे आपणावर  कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.परंतु सर्वांनी आधी  उपस्थिती द्वारे हजेरी नोंद करावी आणि आणि मग त्यानंतर सेल्फी  द्वारे नोंद घ्यावी.

२८) *उपस्थिती app च्या विद्यार्थी यादी मध्ये काही विद्यार्थ्यांचे दोन  वेळा नाव दिसते परंतु student पोर्टल मध्ये पाहिले तर एकदाच  नाव दिसत आहे,असे झाल्यास काय करावे ?*

*उत्तर* : अशा उदाहरणामध्ये उपस्थिती app मध्ये refresh student list  या  बटनाला क्लिक करा.थोड्याच वेळात आपली समस्या सुटेल.

२९) *नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन नसताना उपस्थिती app ओपन होते का ?*

*उत्तर* : उपस्थिती app रजिस्टर करताना आणि उपस्थिती submit  करताना  नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता असते.त्यामुळे  उपस्थिती app ओपन करण्यासाठी नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन ची  आवश्यकता नाही. नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन नसतानाही आपण  सेल्फी save करू शकणार आहोत हे लक्षात घ्यावे.फक्त save  केलेली सेल्फी submit करण्यासाठी आपणास  नेटवर्क/इंटरनेट  कनेक्शनची आवश्यकता आहे.

३०) *उपस्थिती app एकदा mobile मध्ये इंस्टाल करून रजिस्टर केले ,   त्यानंतर जर mobile हरवला अथवा खराब झाला तर दुसऱ्या  mobile वर app इंस्टाल करून उपस्थिती भरता येणे शक्य होईल  का ?*

*उत्तर* :   होय. उपस्थिती app एकदा mobile मध्ये इंस्टाल करून  रजिस्टर केले ,  त्यानंतर जर mobile हरवला अथवा खराब झाला  तर दुसऱ्या mobile वर app इंस्टाल करून उपस्थिती भरता येणे  शक्य आहे.फक्त यासाठी आपणास आपल्या शाळेच्या student  लॉगीन ला जाऊन Attendance App या Tab मधील  Unregister Teacher या बटनावर क्लिक करून स्वतः ला  पूर्वीच्या mobile मधून unregister करून घ्यावे लागेल आणि  त्यानंतरच आपण दुसऱ्या mobile वर उपस्थिती app वापरू  शकाल.

३१) *एकाच वेळी एका वर्गाची उपस्थिती वेगवेगळ्या  mobile  चा वापर  करून भरता येते का ?*
  
*उत्तर* : नाही.एका वेळी एकाच mobile वर उपस्थिती भरता येते.जर  दुसऱ्या mobile द्वारे  आपणास उपस्थिती भरावयाची असल्यास  आधीच्या mobile वरून आपणास unregister व्हावे लागते.

३२) *सोमावारी उपस्थिती नोंद करताना सेल्फी सह उपस्थिती नोंद  करावयाची आहे.जर काही कारणास्तव सोमवारी उपस्थिती ची नोंद  करता आली नाही तर दुसऱ्या दिवशी नोंद घेतली तर चालेल का ?*

*उत्तर* : नाही.उपस्थिती app मध्ये सेल्फी सह उपस्थिती घेण्याची सुविधा  फक्त आणि फक्त सोमवारीच उपलब्ध होते.इतर दिवशी आपणास  सेल्फी सह उपस्थिती  नोंद करन्याक्घी सुविधा देण्यात येत  नाही.त्यामुळे सोमवारीच सेल्फी सह उपस्थितीची नोंद घ्यावी.मात्र  सोमवारी save केलेली सेल्फी ही submit करण्यासाठी आपण  कोणत्याही दिवशी करू शकाल ही बाब महत्वाची आहे.
३३- सेल्फी सह उपस्थिती घेताना एकदा save केलेला फोटो पुन्हा काढून  टाकता येईल का ?
उत्तर : नाही.एकदा save केलेला फोटो सेल्फी Gallery मधून काढून  टाकता येत नाही. 


*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*